SBI मध्ये सरकारी योजनेतून मिळणार ‘ही’ सुविधा…
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) विशेष मुदत ठेव योजना अमृत कलशमध्ये गुंतवणूक करण्याची संधी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. कारण, या योजनेच्या गुंतवणुकीची मुदत जवळ आली आहे. अशा तऱ्हेने सर्वाधिक व्याज दर देणाऱ्या या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आता गुंतवणूक करणे तुमच्यासाठी योग्य ठरेल. सर्व वयोगटातील लोक यात गुंतवणूक करू शकतात आणि गुंतवणुकीवर मिळणारे व्याज बँक मासिक, तिमाही आणि सहामाही तत्त्वावर देते.
एसबीआयच्या ग्राहकांना पीएम जीवन ज्योती विमा योजना, पीएम सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना यासारख्या सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये नोंदणी करण्यासाठी आधार पुरेसे असेल. पूर्वी त्यासाठी आधार, बँक पासबुक आणि इतर अनेक कागदपत्रांची आवश्यकता होती. एसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी ही सेवा सुरू केली आहे.
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) ग्राहकांना आधार कार्ड देऊनच सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये नाव नोंदणी करण्याची सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. एसबीआयचे चेअरमन दिनेश खारा यांनी सुरू केली नवी सुविधा, आता या सेवा बँकेच्या कस्टमर सर्व्हिस पॉईंटवर (सीएसपी) उपलब्ध होणार आहेत. आधार-आधारित नावनोंदणी सुविधा सुरू करून एसबीआयने विविध सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये नावनोंदणीची प्रक्रिया सुलभ करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.
एसबीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, कस्टमर केअर सेंटरला (सीएसपी) येणाऱ्या ग्राहकांना पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना यासारख्या योजनांमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी केवळ त्यांच्या आधार कार्डची आवश्यकता असेल. यापुढे अशा कामांसाठी ग्राहकांना त्यांचे पासबुक सीएसपीवर नेण्याची गरज भासणार नाही, असे सांगण्यात आले आहे.

एसबीआयचे चेअरमन दिनेश खारा म्हणाले की, आर्थिक सुरक्षेतील अडथळे दूर करून समाजातील प्रत्येक घटकाला सक्षम करण्याच्या उद्देशाने नवीन सुविधेमुळे सामाजिक सुरक्षा योजनांची व्याप्ती वाढण्याची अपेक्षा आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना नावनोंदणीच्या वेळी अनेक प्रकारची कागदपत्रे द्यावी लागत होती, जी आता आधारद्वारेच पूर्ण केली जाणार आहेत.