Take a fresh look at your lifestyle.

शिक्षक भरती प्रक्रियेंतर्गत पात्रताधारक उमेदवारांना स्वप्रमाणपत्रासाठी 15 सप्टेंबर पर्यंत अंतिम मुदत…

0

सहा महिन्यांपासून रखडलेल्या शिक्षक पदभरतीला अखेर सुरवात झाली आहे. पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी २०२२ परीक्षा दिलेल्या उमेदवारांचे स्वप्रमाणपत्र तयार करण्याच्या प्रक्रियेला शुक्रवारपासून (ता. १) सुरवात झाली.येत्या १५ सप्टेंबरपर्यंत स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

पात्रताधारक उमेदवारांचे शिक्षक होण्याचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी २०२२ परीक्षा २२ फेब्रुवारी ते ३ मार्चदरम्यान ऑनलाइन माध्यमातून झाली.

उमेदवारांना आवश्यक सूचना https://mahateacherrecruitment.org.in/ या संकेतस्थळावरील पोर्टलवर देण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेनंतर शिक्षकांच्या रिक्त जागांची जाहिरात पोर्टलवर प्रदर्शित केली जाईल.

गुणवत्तेनुसार उमेदवारांचे पसंतीक्रम घेण्यात येतील आणि नंतर निवड यादी तयार करून नियुक्ती देण्यात येईल. एकूण किती जागांवर पदभरती होईल याबाबत शिक्षण विभागाकडून स्पष्टता दिलेली नाही.