Take a fresh look at your lifestyle.

महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारची ‘ही’ अनोखी योजना…

0

महिला सक्षम असणे आणि स्वतःच्या पायांवर उभ्या असणे देखील फार गरजेचे आहे. त्याने कुटुंबातील आर्थिक स्थर स्थिर राहण्यास मदत होते. एक कुटुंब आर्थिक दृष्ट्या सक्षम असल्यास काही काळाने संपूर्ण देशाचा विकास होण्यास मदत होईल. यामुळेच केंद्र सरकारने स्त्रियांसाठी एक अनोखी योजना आणली आहे. नई रोशनी योजना असं या योजनेचं नाव आहे. या योजनेत जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा आणि योजनेचा लाभ करून घ्यावा असं आवाहन केंद्र सरकारने केलं आहे. नई रोशनी योजनेचा लाभ घेण्यासाठी गरीब कुटुंबातील महिलांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे.

या योजनेमार्फत महिलांना विविध गोष्टींचे ज्ञान दिले जाणार आहे. बँकिंग, ऑनलाईन पेमेंट, संवाद अशा विविध गोष्टी शिकवल्या जाणार आहेत. यामुळे महिलांना समाजात वावरताना कोणत्याही गोष्टीत अडथळा राहणार नाही. आपल्या अडचणी त्या स्वतः सहज सोडवू शकतील. दैनंदिन जीवनातील व्यावहारिक ज्ञान, स्वच्छ भारत, वैद्यकीय, राजकीय, महिलांसाठी असलेले अधिकार या सर्वच गोष्टींची माहिती दिली जाणार आहे. यासह महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी मदत केली जाणार आहे.

या योजनेत अपंग महिलांना देखील संधी दिली जाणार आहे. 75 टक्के गरीब कुटुंबातील महिलांना यात प्राधान्य आहे. अन्य वर्गातील महिलांसाठी 25 टक्के देण्यात आलेत. नई रोशनी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधी nairoshni-moma.gov.in या संकेस्थळावर भेट द्यावी लागेल. पुढे तुम्हाला तुमचे पहिल्यांदा रजिस्टेशन करावे लागेल. विचारलेली माहिती भरल्यानंतर एक OTP येईल. त्यानंतर तुमचे राजिस्टेशन झाल्यावर लॉगिन करावे लागेल.