…या उमेदवारांसाठी स्पर्धा परीक्षांच्या पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे ‘बार्टी’ मार्फत आवाहन
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी जेईई (JEE) आणि नीट (NEET) या स्पर्धा परीक्षांच्या लातूर या ठिकाणी पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे मार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी जेईई (JEE) आणि नीट (NEET) या स्पर्धा परीक्षांचे निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण खाजगी प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून जेईई (JEE) आणि नीट (NEET) या परीक्षांच्या पूर्व प्रशिक्षणाकरीता प्रत्येकी १०० असे एकूण २०० विद्यार्थ्यांसाठी लातूर या ठिकाणी प्रशिक्षण राबविण्यात येत आहे.
पात्रता
१. उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
२. उमेदवाराकडे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा दाखला व अधिवास असावा
३. उमेदवार शैक्षणिक वर्ष सन २०२३ २०२४ मध्ये इयत्ता ११ वी (विज्ञान) चे शिक्षण ४. रु. ८ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न मर्यादा असलेला उमेदवार प्रशिक्षणासाठी पात्र असेल घेत असावा
५. अनाथ आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराकडे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक.
६. दिव्यांग आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक.

आरक्षण
• ३०% जागा महिलांसाठी, ४% जागा दिव्यांग असलेल्या व्यक्तींसाठी ५% जागा अनुसूचित जाती अंतर्गत
वंचित जाती मधील (वाल्मिकी व तत्सम जाती- होलार, बेरड, मातंग, मांग, मादगी, इ १% जागा अनाथ उमेदवारांसाठी आरक्षित असतील. तसेच एकूण जागांच्या ५ % जागा विशेष बाब म्हणून राखीव ठेवण्यात येईल.
प्रशिक्षणाच्या अटी व शर्ती
१. ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख ०८/०९/२०२३
२ प्रशिक्षण कालावधी १२ महिन्यांचा राहील.
३. निवड झालेल्या पात्र विद्याथ्यांना प्रशिक्षण दरम्यान ७५ टक्के पेक्षा जास्त कालावधी प्रशिक्षणास उपस्थित राहिल्यास त्या विद्यार्थ्यांना दरमहा रु.६०००/- एवढे विद्यावेतन अदा करण्यात येईल.
४. निवड झालेल्या पात्र विद्याथ्यांना पुस्तक संचाकरीता प्रती विद्यार्थी रु.५०००/- एवढी रक्कम अदा करण्यात येईल. ५. सदर योजनेबाबत / प्रशिक्षणाबाबत काही वाद अथवा घोरणात्मक पेच / प्रसंग निर्माण झाल्यास याबाबतचे अंतिम सर्व अधिकार मा. महासंचालक, बार्टी व शासनास राहतील.
● इच्छुक व पात्र उमेदवारांनी दि. २५/०८/२०२३ पासून या https://he.bartieducare.in/student/register लिंकवरून ऑनलाईन नोंदणी करावी.