Take a fresh look at your lifestyle.

ISRO मध्ये नोकरीला लागायचं? तर निवडा ‘हे’ कोर्स…

0

एरोस्पेस अभियांत्रिकी:- स्पेसेसशिपमधील किंवा उपग्रहांमधील प्रणालीचे एकीकरण आणी कार्यप्रणालीवर नजर ठेवण्याचे कामही एरोस्पेस इंजिनिअरिंग करतात. शिवाय, अत्याधुनिक वैमानिक वाहनांचे डिझायनिंग आणि उत्पादन हाही यातील मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंगचाच एक भाग आहे.

एव्हियोनिक्स अभियांत्रिकी:-एव्हीओनिक्स इंजिनिअरिंग केलेली व्यक्ती नवनवीन डिझाईन्स विकसित करणे आणि त्यांची चाचणी करण्याचे काम करतात. ISRO मधील एव्हीओनिक्स अभियंते विमान आणि अंतराळ यानाचे नियंत्रण आणि मार्गदर्शन करणार्‍या इलेक्ट्रॉनिक प्रणालींचे काम सुरळीतपणे सुरु असल्याचे सुनिश्चित करण्याची जबाबदारी ही यांच्यावर असते.

भौगोलिक अभियांत्रिकी:- भौगोलिक डेटा गोळा करणे, विश्लेषण करणे आणि त्याचा अर्थ लावणे म्हणजे भौगोलिक अभियांत्रिकी. ISRO भूस्थानिक अभियंते मॅपिंग, नेव्हिगेशन आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. रिमोट सेन्सिंग आणि जीआयएसचा वापर करून पृथ्वीच्या पृष्ठभागावरील डेटा गोळा आणि विश्लेषण करण्यासाठी केला जातो.

रिमोट सेन्सिंग:- इस्रो रिमोट सेन्सिंग शास्त्रज्ञ उपग्रह आणि इतर रिमोट सेन्सिंग डेटा गोळा आणि विश्लेषण करतात. ते पृथ्वीची जमीन, समुद्र, वातावरण आणि नैसर्गिक संसाधनांबद्दल डेटा गोळा करण्यासाठी ऑप्टिकल आणि रडार सेन्सर वापरतात. हा डेटा हवामानाचा अंदाज, कृषी निरीक्षण आणि पर्यावरणीय मूल्यमापनासाठी महत्त्वपूर्ण ठरतो.