SBI ने ‘या’ योजनेत केली मुदतवाढ…
SBI बँकेने ग्राहकांना एक खूशखबर दिली आहे. एसबीआय बँकेने अमृत कलश योजनेत पुन्हा एकदा वाढ केली आहे. यासंदर्भात स्टेट बँक ऑफ इंडियाने एक सर्क्युलर जारी केलं आहे. त्यामध्ये या योजनेची तारीख 31 डिसेंबर 2023 करण्यात आली आहे. याआधी या योजनेची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2023 होती.
SBI बँकेने अमृत कलश ही योजना 12 एप्रिल 2023 रोजी लाँच केली होती. या योजनेत ग्राहक 2 कोटींपेक्षा कमी रक्कम 400 दिवसांसाठी ठेवू शकतात. विशेष म्हणजे या बँकेत प्रत्येकी एक, तीन आणि सहा महिन्याला व्याज दिले जातं.

अमृत कलश योजनेत व्याज किती:- SBI बँकेने आपल्या नियमित ग्राहकांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अमृत कलश योजना सुरु ठेवली आहे. यामध्ये 8.1 टक्के आणि 7.6 टक्के व्याज दिल जातं.