Take a fresh look at your lifestyle.

महावितरणच्या ‘या’ योजनेतंर्गत नोंदणी करा आणि आपल्या विजबिलात मिळवा ‘इतक्या’ रुपयांची सूट

0

ग्राहकांना ऑनलाइन वीजबिल भरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी महावितरणने विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या धोरणाला अधिक प्रोत्साहित करण्यासाठी जे वीजग्राहक छापील वीजबिलाऐवजी ई-मेल व एसएमएसचा पर्याय स्वीकारतील, अशा सर्व ग्राहकांना प्रती बिल १० रुपये सवलत दिली जाणार आहे.

महावितरणच्या ग्राहकांना वीजबिलाची माहिती व वीजबिल भरण्यासाठी मोबाइल अॅप व महावितरणच्या पोर्टलवर ऑनलाइनसह विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या सर्व सुविधा उपलब्ध असतानाही महावितरणतर्फे ग्राहकांना छापील वीजबिलही उपलब्ध करून देण्यात येते. परंतू जे ग्राहक गो-ग्रीन सुविधेचा पर्याय निवडतात, अशा ग्राहकांना छापील बिलाऐवजी ईमेल व एसएमएसद्वारे वीजबील उपलब्ध करून दिले जाते. या सर्व ग्राहकांना प्रतिबिलची नोंदणी महावितरणच्या मोबाइल अॅपद्वारे अथवा महावितरणच्या संकेतस्थळावर जाऊन करावी लागणार आहे.

गो-ग्रीनचा पर्याय निवडल्यास वीजबिलावरील सवलतीसह ग्राहकांना तातडीने वीजबील मिळणार असून, संदर्भासाठी वीजबिलाचे जतन करणेही सोपे राहणार आहे. तसेच गो-ग्रीनचा पर्याय पर्यावरणाला पूरक असणार आहे. वीजग्राहकांनी जास्तीत जास्त कागद विरहीत गो-ग्रीन सुविधेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

‘गो- ग्रीन’ योजनेंतर्गत नोंदणी करण्यासाठी सर्व प्रथम खालील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडच्या पोर्टलला भेट द्या.

https://pro.mahadiscom.in/Go-

Green/gogreen.jsp