श्री बृहद् भारतीय समाज शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता शिष्यवृत्ती
श्री बृहद् भारतीय समाज, वैद्यकीय (एम.बी.बी.एस., आयुर्वेद आणि होमिओपथी) अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, फार्मसी, संगणक शास्त्र, कृषी पशुरोगचिकित्सा शाख, नर्सिंग, शिक्षण शास्त्र यात भारतीय विद्यापीठात पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम व पदव्युत्तर अभ्यासक्रम करीत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांकडून आणि विदेशातील मूळ भारतीय विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी विहित प्रपत्रामध्ये अर्ज मागवीत आहे. किमान ७०% गुण मिळविणारे प्रथम वर्षाचे विद्यार्थी आणि त्यांच्या शेवटच्या विद्यापीठ परीक्षेत किमान ६०% गुण मिळविणारे अन्य विद्यार्थी, नर्सिंग शिक्षणाकरिता प्रथम वर्ष व त्यावरील वर्षात शिकणाऱ्या किमान ४५% गुण असणाऱ्या विद्यार्थिनी अर्ज करण्यास पात्र आहेत. पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न रु. १,५०,००० किंवा त्यापेक्षा कमी असलेल्यांना प्राधान्य देण्यात येईल. शिष्यवृत्ती देण्यासाठी गुणवत्तेच्या आधारावर विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. केंद्र / अथवा राज्य सरकारकडील किंवा त्यांचे विद्यापीठ महाविद्यालय / संस्था यांच्याकडील शिष्यवृत्ती मिळत असलेले विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र नाहीत.
अर्ज, प्रपत्रे आणि नियमांच्या प्रती एन. के. मेहता इंटरनॅशनल हाउस, १७८, बँकबे रिक्लमेशन, बाबुभाई एम. चिनॉय मार्ग, एल.आय.सी. योगक्षेमच्या मागे, चर्चगेट, मुंबई ४०००२० येथील समाजाच्या कार्यालयात उपलब्ध आहेत आणि हा अर्ज मोठ्या आकाराचा स्वतःचा पत्ता लिहिलेला (रु. २०/- ची तिकिटे लावलेला) लिफाफा समाजाकडे पाठवून सुध्दा मिळविता येईल. समाजाच्या कार्यालयामधून अर्ज घेण्याची अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०२३ आणि पूर्ण भरलेले अर्ज प्रपत्रे परत करण्याची अंतिम तारीख ०४ सप्टेंबर २०२३ राहील. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक : (०२२) २२०२०११३.

एस. व्ही. फेणे
सचिव- श्री बृहद् भारतीय समाज