महसूल विभागाकडून तलाठी भरतीबाबत नवीन शुद्धीपत्रक जारी…
तलाठी भरती सन २०२३ साठी ऑनलाईन संकेतस्थळावर उमेदवाराने पेसा क्षेत्रामध्ये अर्ज भरताना पेसा क्षेत्रातील रहिवासी पुरावा अपलोड करा या ठिकाणी कागदपत्र अपलोड करताना उमेदवाराकडे पेसा क्षेत्रातील रहिवासी प्रमाणपत्र नसल्यास त्यांनी शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, स्वयंघोषणापत्र अपलोड करावेत.

उमेदवाराची अंतिम निवड झाल्यानंतर कागदपत्र पडताळणीच्या वेळी पेसा क्षेत्रातील रहिवासी असल्याबाबतचे प्रमाणपत्र उमेदवारास सादर करणे बंधनकारक राहील याची नोंद घ्यावी.