‘या’ महानगरपालिकेच्या मागासवर्गीय कल्याणकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
महिला व बाल कल्याण योजना, मागासवर्गीय कल्याणकारी योजना, युवक कल्याणकारी योजना या योजनांतर्गत युवक, युवती, महिला, पुरुषांकडून खालील योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणेत येत आहे.

उपरोक्त योजनांचे अर्ज दि. १० जुलै २०२३ ते दि. ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने dbt.punecorporation.org या संकेतस्थळावरती भरणेत यावेत. तसेच याबाबतचा तपशील व अटी व शर्ती या पुणे महानगरपालिकेच्या dbt punecorporation.org या संकेतस्थळावरती बघण्यात यावे. अधिक माहितीसाठी संपर्क क्र. १८००१०३०२२२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.