Take a fresh look at your lifestyle.

स्वाधार योजना; विद्यार्थ्यांचे प्रस्ताव स्विकारण्याकरिता मुदतवाढ

0

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने अंतर्गत सन २०२२-२३ मधील अर्ज ३१ मार्च २०२३ पर्यंत स्विकारण्यात आले.

तथापी, विदयार्थी, पालक, विविध संघटनेमार्फत विदयार्थ्याचे स्विकारण्याबाबत करण्यात आलेली विनंती विचारात घेऊन तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या लाभापासून गरजू विदयार्थी वंचित राहू नये, यासाठी शासनाने सदर योजने अंतर्गत सन २०२२-२३ मधील प्रवेशित विदयार्थ्याचे अर्ज स्विकारण्याकरीता दिनांक १४ जुलै २०२३ पर्यंत मुदतवाढ दिली आहे,

असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण दत्तात्रय वाघ यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.