महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती (MIPRF) वर्ष २०२३ अर्ज करण्याचे आवाहन
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती), नागपूरमार्फत महाराष्ट्रातील नॉनक्रिमीलेअर गटातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील पी.एच.डी. करिता नोंदणी केलेल्या उमेदवारांना महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती (MIPRF) प्रदान करण्याकरिता महाज्योतिीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर ऑनलाइन स्वरूपात अर्ज मागविण्यात येत आहेत.
योजनेचा सविस्तर तपशील www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाइन अर्ज करण्याचा कालावधी दि. २५/०६/२०२३ ते दि.२५/०७/२०२३
ऑफलाइन अर्जाची आवश्यक कागदपत्रासाहित महाज्योती कार्यालयात जमा करण्याचा अंतिम दि. ३१/०७/२०२३.

विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या संकेतस्थळावरील योजनेचा तपशील काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा, योजनेच्या अटी व शर्ती तसेच जाहिरातीत तपशिलात योग्य तो बदल करण्याचा रद्द करण्याचा अधिकार महाज्योतीच्या संचालक मंडळाने राखून ठेवलेला आहे.