Take a fresh look at your lifestyle.

अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

0

परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या महाराष्ट्रातील अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांन परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी मिळावयाच्या परदेश शिष्यवृत्ती निवडीसाठी सन 2023-24 करिता पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

योजनेच्या अटी व शर्ती

● विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

● विद्यार्थी अनुसूचित जाती/नवबौद्ध घटकातील असावा.

पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्षे व पीएचडीसाठी 40 वर्ष ही कमाल वयोमर्यादा असेल.

● विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. 6.00 लाखापेक्षा जास्त नसावे.

(विवाहित महिला उमेदवारांनी पतीकडील कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न आवश्यक आहे. जर विवाहित महिला उमेदवार विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित किंवा पतीपासून विभक्त असलेल्या व वडिलांकडे वास्तव्यास असलेल्या महिला उमेदवारास वडिलांकडील कुटुंबाच्या उत्पन्नानुसार अर्ज करतेवेळी विधवा, घटस्फोटित किंवा पतीपासून विभक्त असलेल्या उमेदवारांनी तसे कायदेशीर कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे.)

● जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या 100 विद्यापीठामध्ये व LONDON SCHOOL OF ECONOMICS मध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना उत्पन्न मर्यादा लागू नाही.

परदेशातील शिक्षण संस्थेत प्रवेश घेणाऱ्या वा प्रवेशित असलेल्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील विद्याथ्र्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येईल; परंतु द्वितीय व तृतीय

वर्षातील विद्यार्थ्यांना पूर्ण केलेल्या अभ्यासक्रम कालावधीची शिष्यवृत्ती अनुज्ञेय असणार नाही. परदेश शिष्यवृत्ती योजने अंतर्गत दोन वर्षे (दिनांकनुसार) कालावधीचाच MBA अभ्यासक्रम अनुज्ञेय राहील.

● भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावरील MD व MS अभ्यासक्रमच प्रवेशासाठी पात्र असतील.

यापूर्वी शासनाकडून परदेश शिष्यवृत्तीअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी परदेशात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी योजनेचा लाभ घेतलेला आहे असे

विद्यार्थीदेखील पीएचडी अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्यास पात्र असतील.

● परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीत (QS World University Rank) 300 च्या आत असावी. तथापि 300 मधील The University of

South Wales (UNSW Sydney), Australia हे विद्यापीठ सदरील योजनेतून वगळण्यात येत आहेत. (जाहिरातीसोबतचे यादीतील)

● एखाद्या शाखेतील विद्यार्थ्यास परदेशातील विद्यापीठाने शासनाने अनुज्ञेय केलेल्या अन्य शाखेअंतर्गत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला असल्यास सदर

प्रवेश परदेश शिष्यवृत्ती योजनेंतर्गत लाभासाठी ग्राह्य धरण्यात येईल.

● शासन निर्णय दि. 27.6.2017 मधील विहित केलेल्या नियमावलीतील परिच्छेद- (ज) (3) मधील तरतुदीनुसार, सदर योजनेअंतर्गत लाभ घेऊ इच्छित असलेल्या विद्यार्थ्यास पुढील सत्राचा टर्मसाठी लाभ मिळण्यासाठी

परदेशातील प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमाचे प्रत्येक वेळी उत्तीर्ण होणे बंधनकारक असून, त्यासाठी शैक्षणिक संस्था/विद्यापीठाचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका, प्रगती अहवाल प्रत्येक सत्रासाठी किंवा सहा महिन्यासाठी दर

करणे अनिवार्य आहे. सदर योजनेच्या सामाजिक न्याय विभाग शासन निर्णय दिनांक 27.6.2017 मधील सर्व अटी शर्थी लागू राहतील.

● अटी व शर्ती ह्या सविस्तर जाहिरातीप्रमाणे व शासननिर्णयानुसार लागू राहतील. सदरील वेबसाईटवरून अर्ज डाऊनलोड करून तो परिपूर्ण व आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक:- 20/06/2023 पर्यंत सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत समक्ष किंवा

पोस्टाने समाज कल्याण आयुक्तालय, 3 चर्च रोड, पुणे-411001 येथे सादर करावा.

● अर्जाचा नमुना व अधिक सविस्तर माहितीसाठी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील रोजगार या लिंकवर भेट द्यावी.

योजनेतील लाभाचे स्वरूप

● विद्यापीठाने प्रमाणित केलेल्या शिक्षण फीची पूर्ण रक्कम तसेच केंद्र शासनाच्या नॅशनल ओव्हरसीज शिष्यवृत्ती योजने अंतर्गत लागू करण्यात आलेली इतर फी मधील (अ) आरोग्य विमा आणि (ब) व्हिसा शुल्क या बाबी परदेश शिष्यवृत्तीधारकांसाठी अनुज्ञेय असतील.

● विद्यार्थ्यास वार्षिक निर्वाह भत्ता अमेरिका व इतर राष्ट्रांसाठी यू. एस. डॉलर 15,400 तर यू.के.साठी जी.बी. पौंड 9900 इतका अदा करण्यात येतो.

● विद्यार्थ्यास परदेशातील विद्यापीठामध्ये प्रवेश घेणेसाठी आणि अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर भारतात परत येण्यासाठी कमीतकमी कालावधीचा आणि नजीकच्या मार्गाचा दराचा (इकॉनॉमी क्लासचा विमान प्रवासाचा दर दिला जाईल.

● विद्यार्थ्याला आकस्मिक खर्चासाठी यू.एस. ए. व इतर देशांसाठी यू.एस. डॉलर 1500 मर्यादित तर यू.के. साठी जी.बी. पौंड 1,100 मर्यादित इतके देण्यात येतात. यामध्ये पुस्तके, अभ्यासदौरा व इतर खर्चाचा समावेश आहे.

● अनु. जातीच्या विद्यार्थ्यांना साठी 2 वर्ष कालावधीकरिता NOC (ना-हरकत प्रमाणपत्र) अटी व शर्तीच्या अधीन राहून दिली जाईल.

● ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न हे रु. 6.00 लाखाच्या आत असेल त्यांना सुरवातीस परदेशातील विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्यासाठी विमान प्रवास भाड्याची रक्कम विद्याथ्याने मागणी केल्यास आगाऊ स्वरूपात अटी व शर्तीच्या अधीन राहून अदा केली जाईल.