समाज कल्याण शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये येथील सरकारी वसतिगृहात २०२३-२४ या वर्षांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेशासाठी सर्व विद्यार्थ्यांनी अर्ज भरावा, असे आवाहन वसतिगृहाच्या गृहपाल यांनी केले आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग, शारीरिकदृष्ट्या दिव्यांग व अनाथ या प्रवर्गातील विद्यार्थिनींना नियमानुसार आरक्षित टक्केवारीप्रमाणे प्रवेश देण्यात येणार आहे. विद्यार्थिनींना प्रा भोजन व निवासासह अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आवश्यक क्रमिक पुस्तके, शैक्षणिक साहित्य, गणवेश व कॉलजचे ड्रेसकोड आदी सरकारने ठरवून दिलेल्या आर्थिक मर्यादेपर्यंतची रक्कम देण्यात येते.

त्याचप्रमाणे दरमहा ६०० रुपये निर्वाह भत्ताही दिला जातो. अर्ज आणि प्रवेश प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी वसतिगृहाशी संपर्क साधावा, असें आवाहन साखरे यांनी केले आहे.