Take a fresh look at your lifestyle.

पुरवठा निरीक्षक व उच्चस्तर लिपिक पदांसंदर्भात शासन निर्णय जारी….

0

१. प्रस्तावनेत नमुद केलेली वस्तुस्थिती विचारात घेऊन, सामान्य प्रशासन विभागाच्या दि.०४.०५.२०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये दिलेल्या निर्देशानुसार अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिपत्याखालील पुरवठा शाखेतील पुरवठा निरीक्षकांची आणि वित्तीय सल्लागार व उप सचिव यांच्या कार्यालयातील उच्चस्तर लिपिकांची सरळसेवेची रिक्त पदे स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणार असून, सदर भरती प्रक्रिया राबविण्यासाठी आय.बी.पी.एस. कंपनीची निवड करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

२. विभागीय आयुक्त यांच्या अधिनस्त पुरवठा शाखेतील पुरवठा निरीक्षक हे पद विभागीय सवर्ग पद आहे. पदभरतीमध्ये एकसुत्रता राहणे आवश्यक असल्याने सदर पदाची भरती प्रक्रिया केंद्रीय पध्दतीने करण्यात यावी.

३. तसेच, पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तर लिपिकांची सरळसेवेची रिक्त पदे स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून भरण्याच्या अनुषंगाने भरती प्रक्रिया राबविण्यासाठी, समन्वय व अनुषंगीक आवश्यक कार्यवाही करण्यासाठी खालील समन्वय अधिकारी यांची नेमणूक करण्यात येत आहे.

४. सदर भरती प्रक्रिया राबविण्याच्या अनुषंगाने शासनाच्या वतीने आय.बी.पी.एस. कंपनीसोबत सामंजस्य करारनामा (MOU) करण्यासाठी उप आयुक्त (पुरवठा), कोकण विभाग, नवी मुंबई यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.

५. परीक्षा शुल्काची रक्कम डेबिट कार्ड (RuPay/Visa/Master Card/Maestro ), क्रेडिटकार्ड, इंटरनेट बँकिंग, IMPS, कॅश कार्ड्स (cash cards) / मोबाइल वॉलेट वापरून भरली जाणारआहे.

यास्तव सदरची रक्कम या विभागाचे आहरण व सवितरण अधिकारी यांचे चालू खाते क्र.६०३५५६००३४८, बँक ऑफ महाराष्ट्र, मंत्रालय, मुंबई शाखा यामध्ये जमा करण्यात यावी.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरउपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२३०५१७१६२६५६०९०६ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात आला आहे.