डॉ.बाबासाहेब आंबेडकर महानिर्वाणाआधी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या प्रस्तावनेत काय म्हणतात ते जाणून घेऊया…
आजच्या दिवशी म्हणजे ५ डिसेंबर मात्र १९५६ डॉ बाबासाहेब आंबेडकर महानिर्वाणाआधी ” बुद्ध आणि त्यांचा धम्म ” या ग्रंथाच्या प्रस्तावनेत म्हणतात…. एक प्रश्न मला नेहमी विचारण्यात येतो की एवढे उच्चशिक्षण मी कसे काय घेतल? दुसरा प्रश्न असा विचारण्यात येतो की माझा कल बौद्ध विचारधारेकडे का आहे. हे प्रश्न मला या कारणास्तव विचारण्यात येतात की मी भारतातील ” अस्पृश्य ” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजामध्ये जन्मलो होतो.
माझ्या मतानुसार बुद्धाचा धम्म श्रेष्ट आहे. दुस-या कोणत्याही धर्माची त्याच्याशी तुलना होऊ शकत नाही. जर एखाद्या विज्ञाननिष्ठ आधुनिक व्यक्तीला धर्म हवा असेल तर त्याला बुद्धाच्या धम्मा शिवाय पर्याय नाही,औ असे माझे पक्के मत सर्व धर्मांचा 35 वर्ष सखोल अभ्यास केल्यावर तयार झाले आहे.
बुद्ध धर्माचा अभ्यास करण्याकडे मी कसा वळलो ती एक वेगळी कथा आहे.
माझे वडील सैन्यात अधिकारी होते, पण त्याचबरोबर ते अत्यंत धार्मिक गृहस्थ होते. त्यांनी मला कडक शिस्तीत वाढविले माझ्या लहानपणापासूनच माझ्या वडिलांच्या धार्मिक जीवनातील काही विरोधाभास मला आढळून आले. त्यांचे वडील रामानंदी (पंथाचे) असले तरी ते मात्र कबीरपंथी होते. तसा त्यांचा मूर्तिपूजेवर विश्वास नव्हता पण तरीही ते गणपतीची पूजा करीत. अर्थात आमच्या करिता, परंतु मला ते आवडत नसे. ते त्यांच्या पंथाची पुस्तके वाचत असत. मला आणि माझ्या मोठ्या भावाला मात्र झोपी जाण्यापूर्वी माझ्या बहिणींना व कथा ऐकणाऱ्या घरी जमलेल्या व्यक्तींना रामायण आणि महाभारतातील काही भाग वाचून सांगण्यास ते आम्हाला भाग पाडीत. कित्येक वर्ष असेच चालू होते.
ज्या वर्षी मी इंग्रजी चौथ्या वर्गाची परीक्षा पास केली त्यावेळी माझ्या समाजातील लोक माझे अभिनंदन करण्यासाठी जाहीर सभा घेऊ इच्छित होते. मी अस्पृश्य जातीतील पहिलाच असा एक मुलगा आहे की जो या अवस्थेपर्यंत पोहोचला आहे मी फार उच्चस्तरावर गेलो असे त्यांना वाटायचे.
माझ्या वडिलांचे जवळचे मित्र दादा केळुस्कराकडे गेले व त्यांना मध्यस्थी करण्यास सांगितले. केळुसकर तयार झाले. थोड्या युक्तिवादानंतर माझ्या वडिलांनी संमती दिली. अभिनंदनाची सभा झाली. दादा केळुसकर सभेचे अध्यक्ष होते ते त्या काळाचे विद्वान गृहस्थ होते.
दादा केळूसकर यांनी मला बुद्धाचे चरित्र मला सप्रेम भेट म्हणून दिले. मी मोठ्या आवडीने ते पुस्तक वाचले. त्या पुस्तकाने मी फार प्रभावित व प्रेरित झालो.
मला प्रश्न पडला की माझ्या वडिलांनी बौद्ध साहित्याचा परिचय आम्हाला कां करून दिला नाही? हा प्रश्न मी माझ्या वडिलांना विचारण्याचा निश्चय केला. आणि एके दिवशी मी तो माझ्या वडिलांना विचारला. मी त्यांना म्हटले की रामायण आणि महाभारतातील शूद्र आणिअस्पृश्यांच्या अध:पतनाच्या आणि ब्राह्मण क्षत्रिय यांच्या महिमा मंडित करणाऱ्या कथा वाचण्यास ते आम्हाला का भाग पाडतात?
माझे वडील म्हणाले की, मी तुम्हाला महाभारत व रामायण वाचावयास का सांगतो याचे कारण असे आहे की, आपण अस्पृश्य आहोत. स्वाभाविकपणे तुझ्यामध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. हा न्यूनगंड दूर करण्यास महाभारत व रामायणाची मदत होऊ शकते. करणा-यांचे उदाहरण पहा ही सामान्य माणसं होती पण त्यांनी मोठी उंची गाठली वाल्मिकीचे पहा तो कोळी होता पण त्याने रामायण लिहिले. तुमच्यामध्ये न्यूनगंड काढून टाकण्यास रामायण आणि महाभारत मी तुम्हाला वाचण्यास सांगतो.
मी म्हणालो मला भीष्म द्रोण आणि कृष्ण आवडत नाही. भिष्म आणि द्रोण पाखंडी होते. ते एक गोष्ट बोलायचे कृती मात्र नेमकी त्याच्याविरोधात करावयाचे. कृष्णाचा दगा बाजीवर विश्वास होता. त्याचे जीवन दुसरे तिसरे काही नसून फसवेगिरी ची मालिकाच होय.मला राम सुद्धा पसंद नाही.शुर्पनखा प्रकरणात, वाली-सुग्रीव प्रकरणात, आणि सितेशी क्रुर वागणुकी संबंधात रामाच्या वर्तणुकीची समीक्षा करा. माझे वडील गप्प राहिले. त्यांनी ओळखले की बंड झाले आहे.
पंजाब येथील नांगल खुर्द चे प्रकाश चंद आणि साकोली या गावाचे मानकचंद रत्तू यांनी या पुस्तकाचे मॅन्यु स्क्रिप्ट टाईप करण्यास जे परिश्रम घेतले त्याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे. त्यांनी ते अनेकदा टंकमुद्रीत केले. नानक चंद रत्तू यांनी हे महान कार्य तडीस नेण्यास फार त्रास व परिश्रम घेतले. आपल्या तब्येतीची काळजी न करता मोबदल्याची अपेक्षा न करता नानक चंद रत्तू यांनी टायपिंग आदिची सर्व कामे केली माझ्या प्रती असलेल्या प्रचंड प्रेमाखातर स्नेहा खातर नानक चंद रत्तू आणि प्रकाश चंद यांनी हे कार्य केले. त्यांच्या परिश्रमाचे मोल दिले जाऊ शकत नाही. मी त्यांचा फार आभारी आहे. या पुस्तकाचे कार्य आरंभिले त्यावेळी मी आजारी होतो. आणि आताही आजारी आहे. काही वेळेस माझी स्थिती इतकी बी घडायची की डॉक्टर्स मला विझणारी ज्योत समजायचे.
संदर्भ… डॉ बाबासाहेब आंबेडकरांची समग्र भाषणे खंड १०.पृ.२०१,२०२,२०३
संपादक.. प्रदीप गायकवाड