Take a fresh look at your lifestyle.

मुलगी झाली तर नाराज कशाला होता; सामाजिक न्याय विभागाच्या कन्यादान योजनेत मिळेल ‘इतक्या’ रुपयांची आर्थिक मदत

0

योजनेचा उद्देश- अनुसुचित जाती (नवबौध्द घटकांसह) विमुक्त जाती, भटक्या जमाती (धनगर व वंजारीसह) विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या मागासवर्गीय कुटुंबातील आणि सामूहिक विवाह सोहळ्यांमध्ये सहभागी होवून विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी कन्यादान योजना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येते.

योजनेच्या प्रमुख अटी

१)वधू व वर हे महाराष्ट्र राज्याचे अधिवासी (Domicile) असावेत.

२)नवदाम्पत्यांपैकी वराचे वय 21 व वधूचे वय 18 पेक्षा कमी असू नये.

३)सामूहिक विवाह सोहळ्याकरीता किमान दहा जोडपी असणे आवश्यक आहे.

४)या योजनेचा लाभ फक्त प्रथम विवाहासाठीच आहे. मात्र, विधवा महिलेस दुसऱ्या विवाहासाठी सुध्दा अनुज्ञेय राहील.

५)स्वयंसेवी संस्था नोंदणीकृत असावी.

६)स्वयंसेवी संस्थेविरुध्द कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंदविलेला किंवा न्यायालयीन प्रकरण नसावे.

७)प्रथम विवाहाच्या सिद्धतेसाठी त्या गावातील सरपंच, पोलिस पाटील, ग्रामसेवक व शहरासाठी नगरसेवक / मुख्याधिकारी किंवा नागरी स्थानिक संस्थेने प्राधिकृत केलेल्या अधिकारी यापैकी दोघांचे प्रमाणपत्र आयोजकांनी प्रस्तावासोबत सादर करावे.

८)विवाह सोहळ्यात भाग घेणाऱ्या दाम्पत्यास जात प्रमाणपत्राची पडताळणी तहसीलदार किंवा उपजिल्हाधिकारी या दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून करणे आवश्यक.

९)विवाह सोहळा स्वयंसेवी संस्थांबरोबर केंद्र, राज्य शासकीय स्वायत्त संस्था, शासकीय प्राधिकरणे, सार्वजनिक प्राधिकरणे जिल्हा परिषद आदींना देखील आयोजित करता येईल.

दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप- या योजनेंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यांमध्ये सहभागी होवून विवाह करणाऱ्या एका जोडप्यास 20 हजार रुपयांचे अर्थसाहाय्य वधूचे आई-वडील किंवा पालकांच्या नावे धनादेशाद्वारे विवाहाच्या दिवशी वितरीत करण्यात येते.

सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेस प्रत्येक जोडप्यामागे ४ हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते.

अर्ज करण्याची पद्धत- सेवाभावी संस्था, यंत्रणेने सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या जोडप्यांची माहिती विहीत नमुन्यातील अर्जात आवश्यक त्या कागदपत्रांसह विवाह संपन्न होण्याच्या किमान 30 दिवस अगोदर सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांच्याकडे सुपूर्द करावी.

संपर्क- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन (सर्व जिल्हे)

संदर्भ- jaybhim.today