जि.प. पदभरतीची माहिती हेल्पलाइनवर मिळणार….
जिल्हा परिषदांमधून होणाऱ्या पदभरतीबाबत उमेदवारांना मिळणारी उडवाउडवीची उत्तरे लक्षात घेता त्यांच्यात असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे आता प्रत्येक जिल्हा परिषदेमधून पदभरती होईपर्यंत हेल्पलाइन क्रमांक सुरू केले जाणार आहेत. या क्रमांकावर उमेदवारांना भरती प्रक्रियेची विस्तृत माहिती मिळणार आहे.
दरम्यान, शासनाने सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या वयोमर्यादेत दोन वर्षांची शिथिलता दिली आहे. तसेच जिल्हा परिषदांमधील रिक्त पदांची बिंदुनामावली अंतिम केली आहे. त्यानंतर आता आय.बी.पी.एस. कंपनीद्वारे अॅप्लिकेशन पोर्टल विकसित करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर राज्यात एकाच वेळी परीक्षा घेण्यासाठी सदर कंपनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय विविध संवर्गांतील पदांसाठी होणार भरती
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात शासनाकडून ७५ हजार पदांसाठी भरती केली जाणार आहे. त्यासाठी शासन स्तरावरून हालचाली सुरु झाल्या आहेत.
ग्राम विकास विभागाच्या अखत्यारीत जिल्हा परिषदेअंतर्गत गट ‘क’मधील तसेच आरोग्य व इतर विभागांतील विविध संवर्गाच्या पदभरतीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर झाला असून, त्यामधून १८ हजार ९३९ पदे भरली जाणार आहेत.

तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक प्रणाली भाडेतत्त्वावर देण्याची शिफारस सचिव समितीने केली आहे. अशातच सध्या जिल्हा परिषदेतील पदभरतीच्या प्रक्रियेकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.