Take a fresh look at your lifestyle.

7/12 उतारा, 8अ उतारा काढण्याची सोपी पद्धत; जाणून घ्या सविस्तर माहिती

0

सातबारा म्हणजे आपल्या जमिनीचा लेखाजोखा असलेलं एक कागदपत्र आहे आणि जमिनीच्या प्रत्येक कामासाठी या कागदपत्राचा उपयोग केला जातो. सातबारा, गाव नमुना 8A, प्रॉपर्टी कार्ड इत्यादी कागदपत्रे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सहज आपल्या मोबाइलवरून काढू शकतात.

सर्वसामान्य नागरिकासोबतच शेतकऱ्यांना सातबारा तसेच आठ अ साठी शासकीय कार्यालयात खेटे मारण्याची वेळ येऊ नये, यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना अवघ्या एका क्लिकवर सातबारा व आठ अ नव्हे तर फेरफार उतारा, मिळकत पत्रिकाही मिळत आहेत. यातून वेळ, पैशांचीही बचत होणार आहे.

या सुविधा ऑनलाइन:– साक्षांकित जुने सातबारा, कोतवाल पुस्तक, गाव नमुना आठ-अ, पेरे पत्रक, नोंदणी, जुने फेरफार, कढई पत्रक तसेच ऑनलाइन सातबारा आधी सुविधा मिळणार आहेत.

ऑनलाइन शुल्क किती:– आपणाला ७/१२ काढताना पैसे भरावे लागतात. त्यातील प्रत्येक कागदपत्रासाठी १५ रुपये शुल्क पडते.

ऑनलाइनसाठी लॉग इन:– पहिले डिजिटल ७/१२ सर्च करावे, त्यानंतर डिजिटल ७/१२ वर क्लिक करावे, नंतर मोबाइल नंबर टाकावा,

पूर्ण माहिती भरावी, पैसे अॅड केल्यानंतर आवश्यक ती कागदपत्र काढता येतात.

कोणते कागदपत्र कशासाठी आवश्यक

सातबारा:– मालकी हक्क पाहण्यासाठी सातबारा उतारा अत्यंत महत्त्वाचा असतो. हे शासकीय अभिलेख महसूल विभागाकडून दिले जाते.

फेरफार उतारा:– एखाद्या व्यक्तीने आपली जमीन दुसऱ्याला विकल्यानंतर विक्री करणाऱ्या व्यक्तीचा गाव नमुना सातमधील हक्क रद्द होतो.

आठ अ उतारा:– एखाद्या व्यक्तीची संबंधित गावामध्ये नेमकी किती जमीन वा क्षेत्र आहे, हे जाणून घेण्यासाठी आठ अ उतारा महत्त्वपूर्ण ठरतो.

मिळकत पत्रिका:– प्रॉपर्टी कार्डलाच मिळकत पत्रिका म्हटले जाते. आता ही पत्रिका डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे.

प्रशासन काय म्हणते:– पूर्वी जमिनीसंदर्भात कुठलाही उतारा घ्यायचा म्हटला की शेतकऱ्यां कार्यालयात खेटे मारावे लागत होते; परंतु आता हे उतारे ऑनलाइन मिळत आहेत. त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैशांचीही बचत झाली आहे, असे तालुका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अधिकृत वेबसाईट- mahabhumi.gov.in