Take a fresh look at your lifestyle.

कोतवालांच्या मानधनात वाढ; शासन निर्णयान्वये मान्यता…

0

कोतवाल संवर्गाच्या बाबतीत “एका साझास एक कोतवाल असे धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्याप्रमाणे राज्यातील कोतवालांची संख्या १२,३२७ व संदर्भीय क्रमांक (३) येथील दिनांक १३/०१/२०१४ च्या शासन निर्णयान्वये, गडचिरोली जिल्ह्यातील संवेदनशिल गावांकरीता कोतवाल संवर्गाच्या ४६६ अतिरिक्त पदांना मंजुरी देण्यात आलेली आहे.

महसूल व वन विभागाच्या संदर्भीय क्रमांक (२) येथील दि.०६/०२/२०१९ व दि.०१/०३/२०१९ च्या शासन निर्णयातील परिच्छेद १ मधील नमूद मानधनाऐवजी आता वर नमुद केल्याप्रमाणे राज्यातील एकूण १२.७९३ कोतवालांना यापुढे दरमहा रु. १५,०००/- (रुपये पंधरा हजार फक्त) इतके मानधन दि. ०१/०४/२०२३ पासून लागू करण्यात येत आहे.

महसूल व वन विभागाच्या संदर्भीय क्रमांक (२) येथील दि.०६/०२/२०१९ व दि. ०१/०३/२०१९ च्या शासन निर्णयातील परिच्छेद २ मधील “जे कोतवाल वरीलप्रमाणे वर्ग-ड च्या सदर कोट्यातील पदांवर पदोन्नतीस पात्र ठरतील त्यांना सदर पदावर नियुक्ती होईपर्यंत दरमहारु.१५,०००/- इतके मानधन देण्यात यावे” ही तरतूद वगळण्यात येत आहे. तसेच उक्त शासन निर्णयांतील उर्वरित तरतूदींमध्ये कोणताही फेरबदल केला नसून सदरच्या तरतूदी: जशाच्या तशाच लागू राहतील.

सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. १७४५२, दि.०९/११/२०२२ व अनी. संदर्भ क्र. १२३,दि. ०९/१२/२०२२ अन्वये दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात आला आहे.