Take a fresh look at your lifestyle.

आपण कर्ज घेतलंय? आपल्या कर्जाच्या हप्त्याबाबत RBI ने दिली ही माहिती

0

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या तीन दिवसांच्या बैठकीनंतर पतधोरण समितीने आज गुरुवारी (दि.6 एप्रिल) रेपो दरात कोणतीही वाढ केली नसल्याचे जाहीर केले आहे. ‘आरबीआय’चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिलेल्या माहितीनुसार रेपो रेट पूर्वीइतकाच म्हणजे 6.5% राहणार आहे. यामुळे कर्जदारांना तुर्तास दिलासा मिळाला असून त्यांचा ईएमआयदेखील वाढणार नाही. 

तसेच, चालू आर्थिक वर्ष 2023-24 साठी जीडीपी वाढ 6.5 टक्के राहील, असा अंदाज शक्तीकांत दास यांनी व्यक्त केला आहे. बँकिंग आणि बिगर बँकिंग वित्तीय व्यवस्था सुस्थितीत असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.