जळगाव शासकीय तंत्रनिकेतन येथे 10 एप्रिल रोजी भरती मेळावा
शासकीय तंत्रनिकेतन, जळगाव येथे 10 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता शिकाउ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

तरी सर्व ITI पास उमेदवारांनी apprenticeshipindia.org या वेबपोर्टलवर नावनोंदणी करावी व सदर भरती मेळाव्यास उपस्थित रहावे, असे सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार मुलभुत प्रशिक्षण तथा अनु. सुचना केंद्र व्दारा औदयोगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.