Take a fresh look at your lifestyle.

आता हवामान विभाग देणार ‘या’ आजाराचा अलर्ट…

0

देशात आपण कुठल्याही डॉक्टरकडे गेलो की तरच मलेरियाबद्दल माहीती समजते. आता भारतीय हवामान विभागदेखील मलेरियाची साथ कुठे तीव्र होणार आहे, याचा अलर्ट देणार आहे. मलेरियाचा उद्रेक कोणत्या भागात होत आहे, हे समजण्यासाठी अ‍ॅप तयार करणार आहे. 

या अ‍ॅपची सर्वाधिक मदत आरोग्य विभागाला होणार आहे. हवामानात बदल झाला की देशाच्या विविध भागांत मलेरियाचा उद्रेक होतो. त्याचा अलर्ट सध्या आमच्या ‘मौसम डॉट जीओव्ही’ या संकेत स्थळावर मिळत आहे. पण त्याला अधिक वेगवान करण्यासाठी लवकरच ‘मलेरिया अलर्ट अ‍ॅप’ तयार करण्यात येणार आहे, अशी माहीती पुणे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे.