Take a fresh look at your lifestyle.

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना; जाणून घ्या सविस्तर माहिती

0

शेतकऱ्यांना सहकारी कृषी पतसंस्थांमार्फत दिलेल्या पीक कर्जावरील व्याज दरात वसुलीशी निगडीत प्रोत्साहनात्मक सूट देण्यासाठी शासनाने महत्त्वूपर्ण निर्णय यापूर्वीच घेतला आहे. शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा खरेदीसाठी अल्प दराने कर्ज मिळावे व या कर्जाची परतफेड मुदतीत व्हावी यासाठी कर्जाच्या दरात सवलत देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राज्य शासनाने अंमलात आणली आहे. 

त्यानुसार, या योजनेचा लाभ पिक कर्जाची उचल 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीतील हंगामामध्ये घेतलेले पिक कर्ज व ते विहित मुदीत फेडणारे शेतकरी सभासद व प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था (विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी) तसेच दि. 28 जून 2010 च्या शासन निर्णय प्रमाणे राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण व व खासगी बँका यांचे शेतकरी सभासद घेऊ शकतात.

शासन निर्णय दि. 11 जून 2021 अन्वये सन 2021-2022 या वर्षापासून पीक कर्ज घेतलेल्या व विहित मुदतीत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत 3 लाखापर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना 3 टक्के व्याज सवलत दिली जात असल्याने शेतकऱ्यांना 0 टक्के व्याज दराने पीक कर्ज मिळत आहे. हे या योजनेचे खास वैशिष्ट्य आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत या आर्थिक वर्षात स्टेट पुल (सर्वसाधारण) मधून 3 लाख 13 हजार 188 शेतकऱ्यांना 55 कोटी रुपयांचा लाभ, जिल्हा नियोजन समिती (सर्व साधारण) योजनेमधून 81 हजार 310 शेतकऱ्यांना 12 कोटी 99 लाख 99 हजार 985 , समाज कल्याण विभाग (विशेष घटक योजना) मधून 933 शेतकऱ्यांना 10 लाख रुपयांचा असे एकूण 3 लाख 95 हजार 431 शेतकऱ्यांना 68 कोटी 9 लाख 99 हजार 985 रुपयांचा या योजनेंतर्गत लाभ देऊन ही योजना राबविण्यात राज्यात सातारा जिल्हा अव्वल ठरला आहे.