Take a fresh look at your lifestyle.

‘या’ विद्यार्थ्यांसाठी बार्टीमार्फत UPSC भारतीय अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२३ साठी आर्थिक सहाय्य योजना

0

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीचे जे उमेदवार भारतीय अभियांत्रिकी मुख्य परीक्षा २०२३ सठी पात्र ठरले आहेत अशा उमेदवारांना एकरकमी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येईल.

योजनेचे स्वरूप:- पात्र अनुसूचित जातीच्या उमेदवारांना बार्टी मार्फत एकरकमी रक्कम रु. ५०,०००/- आर्थिक सहाय्य दिले जाईल.

पात्रता:- १. उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी व अनुसूचित जातीचा असावा.

२. उमेदवार यू.पी.एस.सो. भरतीय अभियांत्रिकी मुख्य परीक्षा २०२३ करिता पात्र असावा.

अर्ज करण्यासाठी:- बार्टी संस्थेने खालील लिंकवर उपलब्ध करून दिलेल्या अर्जाची प्रिंट काढावी. सदर अर्ज पूर्णपणे भरून अर्जासोबत जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र डोमेसाईल प्रमाणपत्र, DAFI उमेदवारांचे बँक खाते क्र. (पासबुकच्या प्रथम पृष्ठाची प्रत) व यु.पी.एस.सी. अभियांत्रिकी पूर्व परीक्षा २०२३ चे प्रवेश पत्र (Admit Card) इ. सर्व कागदपत्रांची स्व-साक्षांकित प्रत व अर्ज स्कॅन करून bhartiupse18@gmail.com या ईमेल आय डीवर पाठवावेत. कागदपत्र स्व-साक्षांकित असणे बंधनकारक आहे.

अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक दि. १७ एप्रिल २०२३.

पात्र उमेदवारांनी अधिक माहिती साठी ०२०-२६३३ ३५९६ येथे संपर्क साधावा.

अर्जाची प्रिंट काढण्यासाठी लिंक- http://barti.maharashtra.gov.in > NOTICE BOARD >