Take a fresh look at your lifestyle.

सरळसेवा भरतीसाठी समाांतर आरक्षणाचा राज्य शासनाचा GR

0

शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एसआरव्ही १०९७/प्र.क्र.३१/९८/१६-अ, दिनांक १६ मार्च, १९९९ नुसार शासन सेवेत सरळसेवेने नियुक्ती करताना समांतर आरक्षण कार्यान्वित करण्यासाठी अनुसरावयाची कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे.

२. अ) श्री. इरफान मुस्तफा शेख यांनी मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, औरंगाबाद खंडपीठ, औरंगाबाद येथे दाखल केलेल्या मूळ अर्ज क्रमांक ३०१ / २००९ मध्ये मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, औरंगाबाद खंडपीठ, औरंगाबाद यांनी दिनांक २६.८.२००९ रोजी दिलेला न्यायनिर्णय, याबाबत करण्यात आलेल्या अपिलावर (रिट याचिका क्रमांक २७२/२०१०) मध्ये मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ, औरंगाबाद यांनी दिनांक १५.११.२०१० रोजी दिलेला न्यायनिर्णय आणि मा.सर्वोच्च न्यायालयाने याबाबतच्या अपिलावर (एसएलपी/सिव्हील सी.सी.१५८०२/२०११) दिनांक २७.९.२०११ रोजी दिलेला न्यायनिर्णय.

ब) त्याचप्रमाणे मा.महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथे दाखल करण्यांत आलेला श्रीमती किर्ती वाघ यांचा मूळ अर्ज क्रमांक ९२४/२०१० मधील दिनांक ११.४.२०११ च्या निर्णयासंदर्भात दाखल झालेल्या पुनर्विलोकन अर्ज क्रमांक ४/२०१२ मध्ये मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई यांनी दिनांक १७.६.२०१३ रोजी दिलेला न्यायनिर्णय.

क) तसेच कु.अर्चना शिवाजी खांबे व इतर यांचा मूळ अर्ज क्रमांक ४३७/२०१२ मध्ये दिनांक २.४.२०१४ रोजी मा.महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई यांनी दिलेला न्यायनिर्णय.

३.उपरोक्त सर्व न्यायनिर्णय विचारात घेता, शासन परिपत्रक दिनांक १६ मार्च, १९९९ मध्ये विहित केलेल्या कार्यपध्दतीसंदर्भात मार्गदर्शनार्थ स्पष्टीकरण निर्गमित करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. त्यानुसार आता खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.

शासन परिपत्रक :- शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एसआरव्ही १०९७ प्र.क्र.३१/९८/१६-अ, दिनांक १६ मार्च, १९९९ मधील परिच्छेद ५ मध्ये विहित करण्यांत आलेल्या कार्यपध्दतीमध्ये मार्गदर्शनार्थ स्पष्टीकरणाचा समावेश करण्यांत येत असून सुधारित परि.५ खालीलप्रमाणे आहे.

शासन सेवेत सरळसेवेने नियुक्ती करताना समांतर आरक्षण कार्यान्वित करण्यासाठी सदर सुधारित कार्यपध्दती अनुसरण्यात यावी.

(अ) प्रथम टप्पा :- खुल्या प्रवर्गातून समांतर आरक्षणाची पदे भरताना, गुणवत्तेच्या निकषानुसार खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची निवड यादी करावी ( या ठिकाणी खुल्या प्रवर्गात गुणवत्तेच्या आधारावर मागासवर्गीय उमेदवारांचाही समावेश होईल).

या यादीत समांतर आरक्षणानुसार आवश्यक खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांची संख्या पर्याप्त असेल तर कोणताही प्रश्न उद्भवणार नाही आणि त्यानुसार पदे भरावीत. जर या यादीत समांतर आरक्षणानुसार आवश्यक खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांची संख्या पर्याप्त नसेल तर खुल्या प्रवर्गासाठी राखीव समांतर आरक्षणाची पदे भरण्याकरिता सदर यादीतील आवश्यक पर्याप्त संख्येइतके शेवटचे उमेदवार वगळून पात्र उमेदवारांपैकी केवळ खुल्या प्रवर्गाचेच आवश्यक पर्याप्त संख्येइतके उमेदवार घेणे आवश्यक आहे.

(ब) दुसरा टप्पा:- त्यानंतर प्रत्येक सामाजिक आरक्षणाच्या प्रवर्गातील उमेदवारांच्या निवड याद्या तयार कराव्यात. (जे उमेदवार यापूर्वीच टप्पा “अ” मध्ये सामील झाले असतील त्यांना या यादीतून वगळावे.)

(क) तिसरा टप्पा :- वरील “ब” नुसार तयार करण्यात आलेल्या याद्यांमध्ये सामाजिक आरक्षणातील (Social Reservation) प्रत्येक प्रवर्गाच्या विहित टक्केवारीनुसार “अ” येथे विशद केलेल्या कार्यपध्दतीनुसार समांतर आरक्षणाचे पुरेसे उमेदवार समाविष्ट करावेत. मात्र असे करताना सामाजिक प्रवर्गांतर्गत रहावे.