Take a fresh look at your lifestyle.

भारतात ३१ हजार वैमानिकांची भरती होणार….

0

बोइंग इंडियाचे अध्यक्ष सलिल गुप्ता यांनी भारतात पुढल्या २० वर्षात ३१ हजार वैमानिकांची भर पडणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भारतात लवकरच वैमानिकांची मागणी वाढणार आहे.

यूएस विमान निर्माता कंपनी बोईंगने म्हटले आहे की विमान उपकरणे उत्पादकांकडून वाढलेल्या ऑर्डरमुळे भारताला पुढील २० वर्षांमध्ये ३१,००० पायलट आणि सुमारे २६,००० मेकॅनिकची आवश्यकता असू शकते. अशा परिस्थितीत या विभागातील लोकांना येत्या काळात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातं आहे.

उद्योग संस्था CII च्या एका कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलताना सलिल गुप्ता म्हणाले की, दक्षिण आशियाई प्रदेश हा पुढील २० वर्षांमध्ये जागतिक स्तरावर सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ म्हणून ओळखला जाईल. त्यामुळे भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राची भरभराट होणार आहे.

तसेच या सर्वासाठी पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणावर भरपूर लक्ष केंद्रित करावे लागेल, असे ही सलिल गुप्ता म्हणाले.