EPFO चा मोठा निर्णय! कर्मचारी पेन्शन योजने अंतर्गत हायर पेन्शनसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली
कर्मचारी पेन्शन योजने संदर्भात सरकारने एक चांगली बातमी दिली आहे. कर्मचारी पेन्शन योजने अंतर्गत हायर पेन्शनसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 3 मार्च 2023 होती. मात्र आता सरकारने अंतिम मुदत वाढवली आहे.

कर्मचारी पेन्शन योजनेचा अर्ज करण्याची मुदत 3 मे 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. EPFO युनिफाइड मेंबर्स https://www.epfindia.gov.in/site_en/index.php या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता. ही मुदत वाढल्याने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हायर पेन्शन म्हणजे काय:- कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत, 15,000 रुपयांपर्यंतच्या पगारानुसार कॉन्ट्रिब्यूशन निश्चित केले जाते. म्हणजेच मूळ वेतन 50,000 रुपये झाले तरीही, EPS मध्ये कॉन्ट्रिब्यूशन केवळ 15,000 रुपयांवरून निश्चित केले जाते. यामध्ये जास्तीत जास्त 15 हजार रुपयांच्या सॅलरीच्या 8.33 टक्क्यांच्या डिडक्शनऐवजी ऐम्प्लॉयीजच्या बेसिक सॅलरीच्या आधारावर करण्यास न्यायालयाने सांगितले आहे.