आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील कुटुंबांना सामाजिक न्याय विभागाच्या ‘या’ योजनेतून मिळते हक्काचे घर…
गरिबांना स्वबळावर घर उभारणे कदापि शक्य नाही. अशा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील कुटुंबांना योजनेतून घर बनवून दिले जाते.
योजनेच्या अटी:- ■ लाभार्थी कुटुंब हे विमुक्त जाती भटक्या जमाती या मूळ प्रवर्गातील तसेच गावोगावी भटकंती करून उपजीविका करणारे असावे.
■ लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १.२० लाखापेक्षा कमी असावे.
■ लाभार्थी कुटुंबाचे स्वतःचे मालकीचे घर नसावे.
घरकुलासाठी किती पैसे मिळतात?
■ समाजाच्या लाभार्थ्यांना सामूहिकरीत्या किंवा
वैयक्तिकरीत्या योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न करावा,
योजनेंतर्गत वैयवित्तक लाभार्थ्यांनाही लाभ दिला जातो.
■ डोंगराळ भागातील लाभार्थ्यांसाठी १.३० लाख व
सर्वसाधारण क्षेत्रातील लाभार्थ्यासाठी १.२० लक्ष इतके
अनुदान देण्यात येते.
ही कागदपत्रे आवश्यक:-
■ जात प्रमाणपत्र,
■ अधिवास प्रमाणपत्र,
■ स्वतःच्या नावाने जमीन नसल्याचे प्रमाणपत्र,
■ सरपंच, पोलिस पाटील आदींची प्रमाणपत्र.
राज्य शासनाने लागू केलेल्या नियमानुसार या योजनेचा
लाभ घेतो. त्यासाठी पात्र व्यक्तींनी अर्ज करून संबंधित
योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेबाबत नागरिकांत जागृती केली जात आहे.
अर्ज करण्याची पद्धत:- योजनेच्या अजांच्या प्रति सामाजिक न्याय विभागात उपलब्ध आहे. या शिवाय संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करता येतो.