राज्यातील शहरांची नावे बदलण्याची प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर माहिती
औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण करण्यासाठी राज्य शासनाच्या प्रस्तावास केंद्र सरकारची मंजुरी तर मिळाली पण नावं बदलण्यासाठी प्रक्रिया नेमकं काय, चला जाणून घेऊयात.

केंद्र सरकारच्या मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली की, आधी सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना काढते, तेव्हा शहरांची नावे बदलतात. ही अधिसूचना जारी झाली असून त्यानुसार औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण होणार आहे. त्यानंतर महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभाग अधिसूचना जारी करेल, तेव्हा संपूर्ण जिल्ह्याचे, तालुक्याचे, महापालिका आणि नगरपालिकेचे सुद्धा नाव बदलेल. दोन्ही जिल्ह्यांसंदर्भात याचीही प्रक्रिया सुरू झाली आहे.