‘सीयूईटी’च्या अर्जांसाठी ३० मार्चपर्यंत मुदतवाढ
पुणे- केंद्रीय विद्यापीठे आणि अन्य उच्च शिक्षण संस्थांतील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी घेण्यात येणाऱ्या केंद्रीय विद्यापीठ पात्रता परीक्षेच्या (सीयूईटी) प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना ३० मार्चपर्यंत अर्ज करता येईल. राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने (एनटीए) ही माहिती दिली.

एनटीएकडून गेल्या वर्षीपासून सीयूईटी प्रवेश परीक्षा सुरू करण्यात आली. शैक्षणिक वर्ष २०२३-२४च्या प्रवेशांसाठी देशातील विद्यापीठे, महाविद्यालये सीयुईटीच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होत आहेत. तसेच सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर सीयूइटी प्रवेश परीक्षेला अर्ज करण्याला ३० दिली आहे.