भारतीय नौकानयन महामंडळ अंतर्गत समुद्र-पूर्व प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन
मे २०२३ बॅचकरिता जीएमई कॅडेट्सची निवड

भारतीय नौकानयन महामंडळ मर्यादित, समुद्री प्रशिक्षण संस्था, मुंबई येथे नौकानयन संचालनालय (डीजीएस) च्या मार्गदशक तत्वांनुसार मे २०२३ मध्ये सुरु होणाऱ्या ०८ महिन्यांच्या समुद्र-पूर्व प्रशिक्षण अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्याकरिता आणि त्यानंतर १० महिने संरचित जहाजी प्रशिक्षणाकरिता पदवीधर मरीन अभियंता (जीएमई) म्हणून पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित केले जात आहेत. इच्छुक उमेदवार अधिक माहितीकरिता आमचे संकेतस्थळ
http://www.mti.shipindia.com/notification पाहू शकतात. ऑनलाईन अर्जांचे सादरीकरण दिनांक २०/०३/२०२३ रोजी ००.०१ वाजता सुरू होऊन

१०/०४/२०२३ रोजी समाप्त होईल. ह्या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यास उत्सुक पात्र उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेनंतर वैयक्तिक मुलाखत आणि वैद्यकीय तंदुरुस्ती चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.