‘या’ मुलांना आता महिन्याला अडीच हजार मिळणार….
महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने बालसंगोपन योजनेंतर्गत अनाथ, निराधार, बेघर, शारीरिक व्यंग किंवा इतर आपत्ती असलेल्या बालकांच्या संगोपनासाठी मासिक अनुदान दिले जाते. यापूर्वी हे अनुदान १,१०० रुपये दिले जात होते. मात्र, या अनुदानात वाढ करण्याची मागणी होत होती. त्यानुसार मंत्रिमंडळाच्या नव्या निर्णयानुसार आता प्रत्येक महिन्याला २,५०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
काय आहे बालसंगोपन योजना:- एक पालक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना शासनस्तरावरून विविध योजनांचा लाभ देणे, त्यांची काळजी घेणे व संरक्षण करणे. यात कोविडने अनाथ झालेल्या बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात येत आहे. निराधार, अनाथांना आधार देण्यासाठी ही योजना आहे.
योजनेचा लाभ कोणाला घेता येतो:- शासनाची बाल संगोपन योजना ज्या मुलांना आई किंवा वडील अथवा दोन्ही नसतील अशा ० ते १८ वयोगटातील बालकांना या योजनेचा लाभ मिळतो.

महिन्याला अडीच हजार रुपये मिळणार
बालकांच्या संगोपनासाठी अगोदर १,२२५ रुपये अनुदान मिळत होते. मंत्रिमंडळाच्या नव्या निर्णयानुसार आता २,५०० रुपये करण्यात आले.
कोरोना काळात बालकांनी पालक गमावलेले अशा अनाथ बालकांचा या योजनेत समावेश केला जाणार आहे.
बालसंगोपन योजनेंतर्गत अनाथ, निराधार, बेघर, शारीरिक व्यंग किंवा इतर आपत्ती असलेल्या बालकांच्या शिक्षण आणि संगोपनासाठी मासिक अनुदान बालकाला त्याच्या कुटुंबात राहून दिले जाते. मंत्रिमंडळाच्या नव्या निर्णयानुसार ते आता २,५०० रुपये दिले जाणार आहेत. याची अंमलबजावणी लवकरच शासनाच्या निर्देशानुसार अधिक माहितीसाठी शासनाच्या शासनाच्या बाल हेल्पलाइन ला कॉल करा 1098 हा शासनाचा चार अंकीच नंबर असतो याच्यावर फोन करून सविस्तर माहिती विचारू शकतात