Take a fresh look at your lifestyle.

‘या’ परीक्षेसाठी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राची मर्यादा वाढली, गेल्या वर्षीचं प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जाणार

0

महाराष्ट्रातील अनेक तरुणांनी 2021 आणि 2022 या वर्षात पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिली होती. पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिल्यानंतर मुलाखतीसाठी 2021-2022 या वर्षाचे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात यावा, अशी मागणी बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली होती. त्यांच्या मागणीनंतर आता 2021-2022 मध्ये काढलेलं नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र ग्राह्य धरल जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 2020 या वर्षांमध्ये शासनाने पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरतीसाठी परीक्षा घेतल्या होत्या आणि त्यामध्ये 2020-21 या वर्षांमध्ये संपूर्ण देशभरामध्ये कोरोना असल्याने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलेयर हे प्रमाणपत्र काढता आलं नव्हतं. त्यामुळे 2021आणि 2022 या वर्षात काढलेलं नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याची मागणी बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.