Take a fresh look at your lifestyle.

‘या’ विभागातील भरती प्रक्रिया आता TCS मार्फत होणार; शासन निर्णय जारी

0

शासन निर्णय

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य सेवा आयुक्तालयांतर्गत गट- “क” व गट-“ड” संवर्गातील सरळसेवा पदभरती ही टी. सी. एस. आय. ओ. एन. (टाटा कंन्सलटंसि सर्विसेस लिमिटेड) यां कंपनीमार्फत करण्यात यावी.

संदर्भ क्र. ३ मध्ये नमूद शासन निर्णयानुसार विहित परीक्षा शुल्क उमेदवारांकडून आकारण्यात येईल.

संदर्भ क्र. ४ मध्ये नमूद शासन निर्णयानुसार वयोमर्यादेत शिथिलता अनुज्ञेय राहील

सदर पदभरती प्रक्रिसेसाठी आयुक्त आरोग्य सेवा, मुंबई यांचेकडून टी.सी.एस.- आय.ओ.एन (टाटा कंन्सलटंसि सर्विसेस लिमिटेड) यांचेशी सामंजस्य करार (MoU) करण्यात येईल.

सदर भरती प्रक्रिया राबविण्यासाठी खालीप्रमाणे निवड मंडळांची स्थापना या शासननिर्णयाद्वारे करण्यात येत आहे.

भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट- ब (अराजपत्रित) गट-“क” व गट-“ड” संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील सरळसेवेने भरण्याबाबतच्या एकत्रित मार्गदर्शक सूचना संदर्भ क्र १ मध्ये नमूद शासन निर्णयानुसार जिल्हा /प्रादेशिक/ राज्यस्तरिय पदे सरळसेवेने भरण्याकरीता निवडसमित्यांची स्थापना करणे, परीक्षा स्वरुप जाहिरात पध्दती समान गुण मिळाल्यास अवलंबवयाची कार्यपध्दती निवडसूचीत समाविष्ट करावयाच्या उमेदवारांची संख्या व निवडसूचीची कालमर्यादा, पदभरती प्रक्रिया अंमलबजावणी व संनियंत्रण, निवडसमितीचे निर्णय अभिलिखीत करणे इ. बाबींच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत.

शासननिणर्यानुसार या पदभरतीसाठी स्पर्धा परीक्षा प्रक्रिया राबविण्यास TCS ION (टाटा कंन्सलटंसि सर्विसेस लिमिटेड) व IBPS या कंपन्यांमार्फत ऑनलाईन पध्दतीने घेणे, परीक्षा कार्यपध्दती व कंपनीला अदा करावयाचे शुल्क निश्चिती याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.