हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत नवीन भरती; केवळ टायपिंग येणं आवश्यक
संस्था:- हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पॉलिक्लिनिक व डायग्नॉस्टिक केंद्र तसेच हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना

भरले जाणारे पद:- संगणक सहाय्यक (DEO)
नोकरी करण्याचे ठिकाण:- मुंबई
वय मर्यादा:- 45 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख:- 13 मार्च 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 15 मार्च 2023
शैक्षणिक पात्रता:- उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षा १०० गुणांची प्रश्नपत्रिका असलेली मराठी विषय ( उच्चस्तर / निम्नस्तर) घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
उमेदवाराने संगणक वापराबाबतचे MS-CIT (3 महिने अथवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा ) शासन मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेमधून उत्तीर्ण केलेला असावा व याबाबतचे महाराष्ट्र राज्य शासनाचे प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे अनिवार्य आहे.
उमेदवाराने मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. टंकलेखन शासन मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेमधून उत्तीर्ण केलेला असावा व याबाबतचे महाराष्ट्र राज्य शासनाचे प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे अनिवार्य आहे. डेटा एन्ट्रीचा वेग कमीतकमी ८००० की डीप्रेशन्स इतका अवगत असावा.
एम.एस. वर्ड, एक्सेल व मुलभूत सांख्यिकिय तंत्राच्या संगणक प्रणालीची माहिती असावी.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोविड-19 कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या / शासनाच्या रुग्णालय / कोविड केअर सेंटर मध्ये किमान ६ माहिने काम केलेल्या उमेदवारास अधिक गुण दिले जातील.