Take a fresh look at your lifestyle.

जळगांव येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन….

0

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विदयमाने पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा दिनांक 11 मार्च 2023 रोजी सकाळी 10.00 वाजेपासून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यांत आलेले आहे.

तरी, २०५९ रिक्तपदांसाठी 10 वी/12 वी पास, आय टि आय., डिप्लोमा धारक, पदवीधर आणि इतर शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांनी आयोजीत करण्यांत आलेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्यांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. वि.जा.मुकणे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता, मार्गदर्शन केंद्र जळगाव यांनी केलेले आहे.