Take a fresh look at your lifestyle.

नागपूर येथे अग्निवीर भरती मेळावा

0

विदर्भातील 10 जिल्ह्यासाठी बुलढाणा जिल्हा वगळून नागपूर येथे अग्निवीर भरत़ी 5 ते 11 जुलै 2023 दरम्यान घेण्यात येणार आहे. उमेदवारांकरिता ऑनलाईन नोंदणी सुरू झालेली असून 15 मार्च 2023 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे.अधिक माहितीकरीता संकेरस्थळाला भेट द्यावी.

यवतमाळ जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी नोंदणी करून अग्निवीर भरतीद्वारे मिळालेल्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ललित वर्‍हाडे यांनी केले आहे.

लष्कराने नागपूर आणि विदर्भातील तरुणांसाठी ‘अग्नीवीर’ भरतीसाठी अर्ज मागवले आहे.

भरती प्रक्रियेत बदलासह ही भरती होण्याची शक्यता आहे. त्याअंतर्गत भरतीस इच्छुक उमेदवारांना प्रथम ‘ऑनलाइन’ सामायिक प्रवेश परीक्षा (सीईई) द्यावी लागेल. यानंतर उमेदवारांना शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय तपासणीस सामोरे जावे लागेल.