Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्रातील 75 हजार नोकरभरती प्रक्रियेला सुरुवात कधी होणार? जाणून घ्या सविस्तर माहिती

0

सरकारने सत्तेवर येताच राज्यात ७५ हजार पदांची नोकरभरती करण्याची घोषणा केली. मात्र, ही घोषणा करून सहा महिने होऊन गेले, भरतीचे काय झाले? राज्यातील बेरोजगार तरुण-तरुणींचा भ्रमनिरास झाला आहे. तुम्ही त्यांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका, असा इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला दिला.

विधानसभेत मांडलेल्या राज्यपालांच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना अजित पवार म्हणाले की, सरकारने नोकर भरतीसाठी टीसीएस आणि आयबीपीएस या दोन कंपन्यांची निवड केली; पण आपण लाखो विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊ शकत नाही, असे या कंपन्यांनी सांगितले. त्यामुळे सरकारने ज्या कंपन्यांची क्षमता आहे, अशा कंपन्यांची निवड करून भरतीबाबत ठोस कार्यक्रम तयार करावा.