Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र नवतेजस्विनी योजना- जाणून घ्या सविस्तर माहिती

0

महाराष्ट्र सरकारने राज्याच्या बजेटमध्ये २०१९- २०मध्ये एक नवीन योजना सुरू केली त्याला नवतेजस्विनी योजनेच्या नावाने ओळखले जाते. या योजनेच्या माध्यनातून सरकार महिलांचा जीवनस्तर उंचावणे व त्यांच्यामध्ये उद्योग कौशल्यामध्ये सुधार करण्याच्या संधी उपलब्ध करेल. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारद्वारे अनेक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आणि स्टार्टअप मार्गदर्शन आयोजित केले जातील. नव तेजस्विनी योजनेचा ग्रामीण भागात जवळपास १० लाख कुटूंबांना लाभ मिळेल.

नव तेजस्विनी ग्रामीण महिला सशक्तिकरण कार्यक्रम ग्रामीण कुटूंबांना दारिद्र्य रेषेबाहेर आणण्यास आर्थिक मदत करेल. त्याचबरोबर तेजस्विनी योजना महिलांना कमी व्याज दराने कर्ज सुविधा उपलब्ध करेल. महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाने ही योजना मंजूर केली असून या योजनेसाठी आवश्यक निधीही मंजूर केला आहे. ग्रामीण महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या धोरणालाही मंजुरी दिली आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय कोष (IFAD) ३३३ कोटी रुपयांचे अनुदान देईल आणि राज्य सरकार १९० कोटी रुपयांचा निधी पुरवठा करेल. हे अनुदान ग्रामीण महिला उद्योजकतेसाठी वापरण्यात येईल.

महाराष्ट्र प्रज्जवला योजनेसाठी अर्ज कसा कराल:- यासाठी तुम्हाला सर्वप्रथम महाराष्ट्र सरकारच्या विविन्न योजनांसाठी अधिकृत वेबसाईट https://mahaschemes.maharashtra.gov.in/ वर जावे लागेल.

त्यानंतर “प्रज्जवला योजना” या ऑप्शनवर क्लिक करावी. या ऑफ्शनवर क्लिक केल्यानंतर ओपन होणार अर्ज तुम्हाला भरावा लागणार आहे. सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा.

सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हा अर्ज यशस्वीरित्या जमा झाल्याचा मेसेज येईल. त्यानंतर या योजनेसाठी तुमचा अर्ज जमा झाल्याचे समजावे.

महाराष्ट्र नव तेजस्विनी योजना:- महाराष्ट्र नव तेजस्विनी योजना गरीब ग्रामीण महिलांना संधी उपलब्ध करून देणे. या योजनेच्या माध्यमातून महिला व महिलांचा बचत समूह आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. ग्रामीण महिला सशक्तिकरण योजना सहभागी महिलांमध्ये कौशल विकास करुन उत्पनामध्ये सुधार करेल.

हा कार्यक्रम महिलांमध्ये साक्षरता व रोजगाराच्या संधी वाढवण्यावर भर देतो. नवीन तेजस्विनी योजना स्थानिक सरकारमध्ये महिलांच्या भागीदारीला प्रोत्साहन देईल व महिलांना सशक्त बनवणाऱ्या सरकारी धोरणांचे समर्थन करेल. महाराष्ट्र राज्य सरकारचा उद्देश्य स्वंय सहायता समूह (SHGs) च्या माध्यमातून महिलांना आर्थिक दृष्ट्या सशक्त बणवणे आहे. ग्रामीण भागात एसएचजी आंदोलन MAVIM च्या माध्यमातून सक्तीने चालवले जाईल.