Take a fresh look at your lifestyle.

निवृत्तीनंतर भरीव पेन्शन मिळवण्यासाठी ‘या’ नव्या सर्क्युलरचे नियम जाणून घ्या….

0

निवृत्तीनंतर पेन्शन म्हणून मोठी रक्कम मिळवायची असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) कर्मचारी पेन्शन योजने अंतर्गत उच्च पेन्शनसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. यासाठी सदस्य आणि नियोक्ते (Employer) संयुक्तपणे अर्ज करु शकतील.

सुधारित योजनेची निवड न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांची मुदत दिली होती. सर्वोच्च न्यायालयाने दिलेली चार महिन्यांची मुदत संपण्यासाठी 15 दिवस शिल्लक असताना ईपीएफओने परिपत्रक काढून सूचना जारी केल्या आहेत.

सुप्रीम कोर्टाने नोव्हेंबर 2022 मध्ये कर्मचारी पेन्शन (सुधारणा) योजना 2014 वैध घोषित केली होती. त्यापूर्वी 22 ऑगस्ट 2022 रोजी EPS मध्ये केलेल्या दुरुस्तीमध्ये, पेन्शनपात्र पगाराची मर्यादा 6500 रुपये प्रति महिन्यावरुन 15,000 रुपये करण्यात आली होते. यामध्ये, जर पगार या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर ते ईपीएसमध्ये वास्तविक पगाराच्या 8.33 टक्के योगदान देण्याचीही परवानगी दिली होती.

3 मार्च 2023 ची डेडलाईन:- सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार पात्र कर्मचारी निकालाच्या तारखेच्या चार महिन्यांच्या आत ईपीएसद्वारे वाढीव पेंशनचा पर्याय निवडू शकतात. हा निकाल 4 नोव्हेंबर रोजी आला होता. या निकालाची चार महिन्यांची मर्यादा म्हणा अथवा डेडलाईन 3 मार्च 2023 रोजी संपत आहे.
अधिकृत वेबसाईट- www.epfindia.gov.in