Take a fresh look at your lifestyle.

कोणतेही तारण न ठेवता 10 लाखांचे कर्ज मिळवा ‘या’ सरकारी योजनेतून

0

तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर केंद्र सरकारची एक खास योजना आहे, ज्याअंतर्गत लोकांना कोणतीही हमी किंवा तारण न ठेवता 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते.

ही योजना प्रधानमंत्री मुद्रा योजना आहे. ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी ही योजना खूप उपयुक्त ठरू शकते, तरुणांना स्वावलंबी बनवण्याच्या आणि छोट्या व्यावसायिकांना बळकट करण्याच्या उद्देशाने मोदी सरकारने 2015 मध्ये ही योजना सुरू केली होती. पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे या योजनेंतर्गत बिगर कॉर्पोरेट आणि बिगर कृषी कारणांसाठी कर्ज दिले जाते.

या योजनेसाठी, तुम्ही कोणत्याही सरकारी-खाजगी बँकांमध्ये तसेच प्रादेशिक ग्रामीण बँका, लघु वित्त बँका, गैर-वित्तीय कंपन्यांमध्ये कर्जासाठी अर्ज करू शकता.

कर्जाच्या रकमेची मर्यादा वर्गवारीनुसार करण्यात आली आहे. यात 3 श्रेणी आहेत.
प्रथम- शिशु कर्ज, यामध्ये 50 हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत उपलब्ध आहे.

दुसरे- किशोर कर्ज, यामध्ये 5 लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध आहे आणि

तिसरे तरुण कर्ज आहे, या कर्जामध्ये 10 लाख रुपयांपर्यंतची रक्कम दिली जाते.