Take a fresh look at your lifestyle.

MPSC च्या जाहिरातीत मोठा बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती

0

महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयांमधील ‘महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023’ मधून भरावयाच्या एकूण 8,169 पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरू होत आहे.

विविध संवर्गातील या भरती प्रक्रियेत फक्त एकाच अर्जाद्वारे उमेदवारांना सहभागी होता येणार आहे. उमेदवारांनी 25 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करावा. या पदभरतीसाठी 30 एप्रिल 2023 रोजी राज्यातील सर्व जिल्हा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे.

बदल:- जाहिरातीमधील परिच्छेद क्रमांक 7.4 मध्ये सहायक कक्ष अधिकारी पदाकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी लागू असल्याचे अनावधानाने नमूद झाले आहे. सदर संवर्गासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी लागू नाही, असे आयोगाने ट्विट करून सांगितले आहे.