Take a fresh look at your lifestyle.

मोठी घोषणा; भारतीय रेल्वेत ७५ हजार नवी नोकरी भरती

0

भारतीय रेल्वे आता सुसाट आणि सुपरफास्ट होणार आहे. भारतीय रेल्वेला 2.4 लाख कोटी रुपये देण्यात येणार आहे. तसेच भारतीय रेल्वेत ७५००० नवीन नोकरी भरती करण्यात येणार आहे, अशी घोषणाच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. रेल्वेच्या नवीन योजनेकरिता ७५ हजार कोटी रुपये दिले जाणार आहे.

नव्या योजनांसाठी 75 हजार कोटी:- भारतीय रेल्वेच्या नव्या योजनांसाठी 75 हजार कोटी रुपये देण्यात येणार आहेत. निर्मला सीतारमण यांनी सांगितलं की, परिवहनाच्या पायाभूत सुविधांसाठी 75000 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. रेल्वेसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 2.4 लाख कोटींची तरतूद केल्याची घोषणा केली आहे.

गेल्या दहा वर्षांमधील ही सगळ्यात जास्त तरतूद आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत ही रक्कम चौपट आहे. तसेच 2013-14 मधील अर्थसंकल्पाशी तुलना केली तर ही रक्कम नऊ पट आहे.