….’या’ भरती परीक्षा दोन्ही एकाच वेळी!
शिक्षक भरतीसाठी तब्बल ५ होणारी राज्यस्तरावरील अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी) आणि देशपातळीवर होणारी केंद्रीय शिक्षक संघटन ही प्राथमिक शिक्षकपदासाठी होणारी परीक्षा एकाच आठवड्यात आली आहे.
यामुळे शिक्षक भरतीसाठी वाट पाहणाऱ्या राज्यातील हजारो तरुण उमेदवारांपुढे कोणत्या परीक्षेला प्राधान्य द्यावे, असा प्रश्न उभा आहे. पवित्र पोर्टल अंतर्गत शिक्षक भरतीसाठी राज्य परीक्षा परिषदेकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून ऑनलाइन परीक्षा २२ फेब्रुवारीपासून ते ३ मार्चपर्यंत आयोजित केली जाणार आहे.

राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचे (टीएआयटी) वेळापत्रक जाहीर केले. परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची सुरू झाली. परीक्षा २२ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान ऑनलाइन प्रवेश परीक्षा होणार आहे. ‘टीएआयटी’कडे राज्यातील पाच लाखपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते.