Take a fresh look at your lifestyle.

एकात्मिक कुक्कुट विकास योजनेतंर्गत ५० टक्के अनुदानावर सुरु करा स्वतः चा पोल्ट्री फार्म….

0

जिल्हा वार्षिक सर्वसाधारण एकात्मिक कुक्कुट विकास या योजनेंतर्गत ५० टक्के अनुदानावर अंडी उत्पादनासाठी वाटप करावयाच्या तलंगा, नर कोंबडे व एक दिवशीय कुक्कुट पक्षी यांच्या गटाच्या आधारभूत किंमतीत सुधारणा करण्यास याद्वारे शासनाची
मान्यता देण्यात येत आहे.

सुधारीत दराने तलंगा गट वाटपासाठी उर्वरीत ५० टक्के रक्कम म्हणजेच रु. ५,४२०/- आणि १०० एक दिवशीय सुधारित कुक्कुट पक्षांच्या पिल्लांचे गट वाटपासाठी उर्वरीत ५० टक्के रक्कम म्हणजेच रु. १४,७५०/- लाभार्थी स्वहिस्सा राहील.

उपरोक्त प्रमाणे सुधारित दर हे आर्थिक वर्ष २०२३-२४
मध्ये अर्थसंकल्पित होणाऱ्या निधीमधून राबवावयाच्या योजनेसाठी दि.०१.०४.२०२३ पासून अंमलात येतील. आयुक्त पशुसंवर्धन, पुणे यांनी दर पाच वर्षांनी या योजनेंतर्गत वाटप करावयाच्या तलंगा, नर कोंबडे व एक दिवशीय कुक्कुट पक्षी यांच्या किमतीचा तसेच कुक्कुट खाद्य किंमतीचा आढावा घेवून दरामध्ये सुधारणा करावयाचा प्रस्ताव आवश्यक त्या समर्थनासह शासनास सादर करावा.

सदर योजनेच्या अमंलबजावणी अनुषंगाने वाचा क्र. १ येथील शासन निर्णयात नमुद मार्गदर्शक सुचनात कुक्कुट पक्षांच्या गटाच्या किंमती व्यतिरीक्त कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सदर योजनेच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी आवश्यक त्या सविस्तर मार्गदर्शक सुचना आयुक्त पशुसंवर्धन, पुणे यांनी क्षेत्रीय कार्यालयांना तात्काळ निर्गमित कराव्यात.