कन्यादान योजनेत मिळणार 20 हजार रुपये….
मागास प्रवर्गातील गरीब मुला-मुलींच्या लग्नात आर्थिक मदत व्हावी, यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सुरू केलेल्या कन्यादान योजनेत दहा हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागतो. यातून मार्ग काढण्यासाठी व विवाहात होणारा अनावश्यक खर्च टाळण्यासाठी सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह करणाऱ्या वरील प्रवर्गातील मुलींच्या लग्नासाठी समाजकल्याण विभागाकडून कन्यादान योजना 2003-04 पासून राबविण्यात येत आहे.
सुरवातीला सोहळ्यात लग्न करणाऱ्या नवबौद्धांसह अनुसूचित जाती, विमुक्त जाती, धनगर, वंजारींसह भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील वधूंना पूर्वी 6 हजार रुपयांचे मंगळसूत्र व 4 हजार रुपयांचे संसारोपयोगी साहित्य दिले जायचे. त्यात नुकताच बदल करण्यात आला आहे. आता ही आर्थिक मदत 20 हजार रुपये करण्यात आली आहे. पूर्वी वस्तूंच्या रूपात दिली जाणारी मदत आता धनादेशाद्वारे वधूच्या आई किंवा वडिलांच्या नावाने देण्यात येणार आहे.
संपर्क:- संबधीत जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण अधिकारी