Take a fresh look at your lifestyle.

युजीसीकडून ‘नेट’ परीक्षेची तारीख जाहीर, अर्ज कधीपर्यंत करता येणार….

0

‘सहायक प्राध्यापक’ पदासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षेची (नेट) तारीख युजीसीने जाहीर केली आहे. त्यानुसार 13 ते 22 जून 2023 या कालावधीत नेट परीक्षा होणार असल्याची घोषणा यूजीसीचे अध्यक्ष एम. जगदेश कुमार यांनी केली.

अर्ज कधीपर्यंत करता येणार:- उमेदवारांना नेट परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार असून, त्यासाठी 17 जानेवारी 2023 पर्यंत मुदत आहे. त्यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात.
नेट परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य, अनारक्षित श्रेणीतील उमेदवारांना 1100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल, तर एससी/एसटी/पीडब्लूडी उमेदवारांना 275 रुपये अर्ज शुल्क आहे.

यूजीसीचे अध्यक्ष एम. जगदेश कुमार यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. परीक्षेच्या तारखा व इतर माहितीसाठी उमेदवारांनी http://nta.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन केले आहे.