Take a fresh look at your lifestyle.

राज्यातील नगरपरिषद आस्थापनेवरील रिक्त पदे भरण्याबाबत शासन परिपत्रक जारी…

0

राज्यातील नगरपरिषदा / नगरपंचायतीच्या मंजूर आकृतीबंधानुसार आस्थापनेवर रिक्त पद असल्यामुळे
प्रशासकीय कामकाज सुरळीत व विहित वेळेत पार पाडण्यात अडचणी निर्माण होते. त्यामुळे रिक्त पदे भरणेबाबत विविध संघटनाकडून शासनाकडे व संचालनालयाकडे मागणी करणेत येते. तसेच शासनाकडून रिक्त पदांच्या पदभरतीबाबत वारंवार आढावा घेण्यात येतो.

सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक प्रानिमं-१२२२/प्रक्र.५४/का-१३अ दि.४ मे, २०२२ नुसार भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील गट ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोटयातील पदे सरळसेवेने भरणेबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्गमित करणेत आल्या असून जिल्हास्तरीय पदे भरणेसाठी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती गठीत करणेत आली आहे.

याद्वारे आपणास कळविणेत येते की, आपल्या जिल्हातील सर्व नगरपरिषदा / नगरपंचायतीमधील गट-क व गट-ड च्या स्थायी रिक्त पदांची पद भरतीसाठी आढावा घेऊन शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले अद्ययावत शासन निर्णय, परिपत्रक तसेच संचालनालयाच्या स्थायी निर्देशानुसार पदभरतीसाठी पूर्वतयारी तात्काळ करावी.