जळगाव जनता सहकारी बँकेत मोठी भरती
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी चालून आलीय. जळगाव जनता सहकारी बँकेत विविध पदांसाठी मोठी भरती आयोजित केली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी 2023 पर्यंत आहेत.

बँकिंग अधिकारी (लिपिक श्रेणी) आणि प्रोबेशनरी ऑफिसर (अधिकारी ग्रेड)/परिविक्षाधीन अधिकारी या पदांसाठी ही भरती होणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
बँकिंग अधिकारी (लिपिक श्रेणी) – प्रथम श्रेणीसह पदवीधर 60% आणि त्याहून अधिक किंवा समतुल्य ग्रेड किंवा LLB/BE गुणांसह 60% आणि त्यावरील किंवा समतुल्य ग्रेड.
प्रोबेशनरी ऑफिसर (अधिकारी ग्रेड)/परिविक्षाधीन अधिकारी – – प्रथम श्रेणीसह पदव्युत्तर पदवीधर जे 60% आणि त्याहून अधिक गुण किंवा समतुल्य ग्रेड किंवा LLB/BE 60% आणि त्याहून अधिक किंवा समतुल्य गुण.
वयोमर्यादा- 21 ते 28 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क- बँकिंग अधिकारी Rs.600/- & प्रोबेशनरी अधिकारी – Rs.1,300/-
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 18 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट- www.jjsbl.com